प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले यांनी केले. या कार्यक्रमात सेवानिवृत्त शिक्षक एन. आर. शेडेकर, आर. के. पाटील, एस. बी. पोवार, उर्मिला सुतार व मुख्याध्यापक प्रल्हादसिंग शिलेदार यांचा सत्कार अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, प्रमुख अतिथी ॲड.विश्वनाथ पाटील व अन्य मान्यवरांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व प्रा.कुराडे लिखित पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात प्रमुख अतिथी ॲड.विश्वनाथ पाटील यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले, शिक्षक हा राष्ट्र घडवित असतो. आपल्या आयुष्यात आपली आई ही आद्य शिक्षिका आहे. आई आणि गुरूंना कधीच विसरू नका. त्यांनी दिलेल्या ज्ञान आणि संस्कारातून आयुष्यात यशस्वी होऊ शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संस्थेचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात म्हणाले,आयुष्याच्या वाटचालीत मार्गक्रमण करीत असताना जगण्याची खरी उर्जा गुरूंनी दिलेल्या ज्ञानातून प्राप्त होते. आयुष्यात चांगले घडविण्याची प्रेरणा गुरुमुळे मिळाली आहे. मिळणाऱ्या संधीतून चांगले करण्याची अमुल्य संधी वाया घालवू नका. अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य चांगल्याप्रकारे घडविण्याचे खरे बळ आजही शिक्षकांमध्येच आहे. अशा समाजशील शिक्षकांची आजही समाजाला खरी गरज आहे.





