Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादीच्या माध्यमातून कामगारांना 'सुरक्षा कवच'

आमदार राजेश पाटील यांचे प्रतिपादन

हलकर्णी येथे बांधकाम कामगारांना सुरक्षा किटचे वाटप 

हलकर्णी : बांधकाम कामगारांना सुरक्षा किटचे वाटप करताना आमदार राजेश पाटील. यावेळी उपस्थित रामाप्पा करीगार, जयकुमार मुन्नोळी, जयसिंग चव्हाण, संतोष पाटील यांच्यासह इतर मान्यवर.

गडहिंग्लज  (प्रतिनिधी) :
राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून असंघटित कामगारांना सुरक्षा कवच देण्याचे काम सुरू आहे. परिसरातील ४५०असंघटित कामगारांची  नोंदणी पूर्ण झाली असून  लवकरच  कामगारांना स्मार्ट कार्ड देण्यात येईल. असे प्रतिपादन आमदार राजेश पाटील यांनी केले.

हलकर्णी (ता. गडहिंग्लज)येथील महालक्ष्मी मंदिरात आयोजित असंघटित बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड व सुरक्षा किट वितरण, कार्यकर्ता मेळावा या संयुक्त कार्यक्रमात बोलत आमदार पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी रामाप्पा करीगार होते.यावेळी कामगारांना 50 सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार पाटील पुढे म्हणाले, स्मार्ट कार्डच्या माध्यमातून कामगारांना विविध सवलती मिळण्यास मदत होणार आहे. महिला कामगारांसाठी ही योजना फायद्याची आहे. शासनाकडून प्रसुती खर्च दिला जातो. तसेच  विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सवलती मिळणार आहेत. नैसर्गिक मृत्यू, विमा कवच आधी लाभांचा यामध्ये समावेश आहे. मतदार संघातील मंजूर विकास कामे लवकरच पूर्णत्वास जाणार असल्याचे देखील आमदार पाटील म्हणाले.  

 यावेळी आमदार राजेश पाटील यांच्यासह रामाप्पा करीगार, अभय देसाई, बाबासाहेब पाटील, मनीषा तेली व इतर  मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.                                     

जिल्हा बँक संचालक संतोष पाटील म्हणाले ,असंघटित कामगारांनी योजनांचा लाभ घ्यावा. आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभे राहावे. असे आवाहन केले.

मनीषा तेली  यांनी सुरक्षा किट ,आरोग्य ,शैक्षणिक, विमा योजना यांचा लाभ असंघटित कामगारांनी घ्यावा असे आवाहन केले.                                                            

 कार्यक्रमास गंगाधर व्हसकोटी, बाबासाहेब पाटील,  जयसिंग चव्हाण, माजी जि. प. सदस्य जयकुमार मुन्नोळी ,अभय देसाई, महाबळेश्वर चौगुले,  दीपक पुजारी , सरपंच शुक्राचार्य चोथे , नरेवाडी सरपंच अंकुश रणदिवे, माजी सरपंच संजय लब्यागोळ, भीमराव सूर्यवंशी ,रामलिंग दुध्यागोळ, फिरोज ताशिलदार, भीमाप्पा शिखरी, सुशांत नौकुडकर, दिलीप कांबळे, अल्ताफ मुल्ला, भीमराव सूर्यवंशी, भीमाप्पा धनगर यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत प्रसाद जोशी यांनी तर प्रास्ताविक भरत पाटील यांनी केले .आभार अशोक पाटील यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.