Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जलप्रदूषण टाळण्यासाठी नदी ऐवजी झाडांना रक्षा विसर्जन

हेब्बाळ जलद्याळ येथे 'अंनिस'चा विधायक उपक्रम 

दुःखात असताना देखील पाटील कुटुंबियांनी घेतलेल्या पर्यावरणपूरक निर्णयाचे सर्वत्र कौतुक 


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
हेब्बाळ जलद्याळ येथील श्रीमती अनुसया भागोजी पाटील यांच्या निधनानंतर रक्षा विसर्जन नदीत न करता ती रक्षा झाडांना घालण्यात यावी या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलेल्या विनंतीस मान देत पाटील कुटुंबीयांनी झाडांना रक्षाविसर्जन करत पर्यावरणपूरक असा संदेश दिल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

हेब्बाळ जलद्याळ (ता.गडहिंग्लज) येथील श्रीमती अनुसया भागोजी पाटील ( वय वर्ष 88) यांचे मंगळवार दिनाक 8 नोव्हेंबर रोजी निधन झाले. आज शुक्रवार दिनांक 11 रोजी रक्षा विसर्जन कार्यक्रम होणार होता. या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा अध्यक्ष पांडुरंग करंबळकर , नेसरी शाखा अध्यक्ष एस.एन.देसाई, नेसरी शाखा सदस्य प्रशांत नाईक यांनी पाटील कुटुंबीयांची भेट घेतली व रक्षा विसर्जन विषयी सविस्तर चर्चा केली. ही रक्षा जर नदीतील वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित केल्यास जलप्रदूषण होते म्हणून ही रक्षा वाहत्या पाण्यात विसर्जित न करता झाडांना खत म्हणून वापर केला तर त्याचा झाडांना उपयोग होईल व तीच झाडे मोठी झाल्यानंतर त्या व्यक्तीची आठवण राहील असे प्रबोधन केल्यानंतर मयत अनुसया पाटील यांची मुलगी तुळसा पाटील यांनी संमती दिली. त्यानंतर रक्षा नदीला न सोडता ही रक्षा झाडांना खत म्हणून घालण्यात आली.

 या बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे👇 क्लिक करा 

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नेसरी शाखेने हा  विधायक उपक्रम राबवत जलप्रदूषण रोखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हेब्बाळ जलद्याळ मधून सुरू झालेले हे पर्यावरणपूरक कार्य आगामी काळात सर्वत्र राबविले जाईल असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नेसरी शाखेचे अध्यक्ष एस. एन. देसाई, अंनिस सदस्य प्रशांत नाईक यांच्यासह हेब्बाळ गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.