Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संकेश्वर- बांदा महामार्ग बाधित शेतकऱ्यांची उद्या भादवण फाटा येथे व्यापक बैठक

गडहिंग्लज (प्रतिनिधी):  संकेश्वर- बांदा महामार्ग बाधित शेतकरी संघटनेतर्फे दिनांक 15 नोव्हेंबर रोजी भादवण फाटा (शृंगार हॉल) येथे सकाळी दहा वाजता व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती महामार्ग बाधित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी दिली.

संकेश्वर- बांदा महामार्गाचे प्रत्यक्ष काम चालू झाले आहे. शेतकऱ्यांना अगर रस्त्याकडेच्या घर मालकांना कोणत्याही प्रकारची नोटीस दिलेली नाही. या संदर्भात आंदोलन करून शासनाचे लक्षही वेधण्यात आले होते. दरम्यान, गडहिंग्लज येथे महामार्ग बाधित शेतकऱ्यांची लढा परिषद देखील घेण्यात आली होती. मात्र शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत काम चालूच आहे. यासाठी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी भादवण फाटा येथे व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी संकेश्वर ते आंबोली पर्यंत सर्व गावातून सर्व पक्ष, संघटनांचे कार्यकर्ते, प्रतिनिधींनी बैठकीला उपस्थित राहून सर्वांनी एकत्र लढण्याची गरज आहे. सर्वांनी उपस्थित राहून लढ्याला पाठिंबा द्यावा असे आवाहन कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.