Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नौकानयन स्पर्धेत 19 वर्षानंतर भारताला यजमानपद

ऑप्टीमिस्ट एशियन आणि ओशेनियन नौकानयन चॅम्पियनशिपस्पर्धेचे उद्घाटन : मुंबईतील गिरगांव चौपाटीतून स्पर्धेला सुरुवात


मुंबई
: तब्बल 19 वर्षानंतर भारतात होणाऱ्या ऑप्टीमिस्ट एशियन अॅण्ड ओशिनियन नौकानयन चॅम्पियनशिप 2022 स्पर्धेचे उद्घाटन आर्मी यॉटिंग नोडमधील महाराष्ट्रगुजरात आणि गोवा क्षेत्रिय मुख्यालयाचे लेफ्टनंट जनरल हरमिंदर सिंग कहलॉन यांच्या हस्ते आज येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात आले. गुरुवार 15 डिसेंबरपासून मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. सन 2003 नंतर भारताला या स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे.

ऑस्ट्रेलियाअमेरिकाचीनजपानश्रीलंकाथायलंडयुएईबेल्जियममॉरिशसतुर्कीहाँगकाँगसिंगापूरमलेशिया  या 13 देशांनी सहभाग घेतला आहे. आर्मी यॉटिंग नोडमधील महाराष्ट्रगुजरात आणि गोवा क्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयभारतीय क्रीडा प्राधिकरणबृहन्मुंबई महानगरपालिका आणि राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सेल ऑप्टीमिस्टयॉटिंग असोसिएशन ऑफ इंडिया (वायएआय) आणि नॅशनल ऑप्टीमिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया (एनओएए)  यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. सर्व 10 शर्यती दररोज प्रति फ्लीट जास्तीत जास्त तीन शर्यतींसह आयोजित केल्या जातील. 19 डिसेंबर 2022 रोजी ठाकर्सचौपाटीमुंबई येथे स्पर्धेचा समारोप होईल.

उद्घाटनप्रसंगी से.नि. कॅप्टन अजय नारंगविविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.  प्रारंभी दीपप्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर भरत नाट्यम नृत्यकलेचे सादरीकरण करण्यात आले. यादरम्यान स्पर्धेत जगभरातील 13 सहभागी देशातील 105 खलाशी आणि प्रशिक्षकांचा परिचय देण्यात आला. यावेळी क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओलक्रीडा आयुक्त सुहास दिवसेउपसचिव सुनील हांजे यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.