गडहिंग्लज (प्रतिनिधी): श्री. मारुती एच.पी गॅस हलकर्णी यांच्यामार्फत तेरणी येथे गॅस सिलिंडर वापरताना सुरक्षितता कशी बाळगावी याबाबत माहिती देण्यात आली. हा कार्यक्रम स्काय लाईन इंग्लीश मेडीयम स्कूल येथे झाला.अध्यक्षस्थानी उपसरपंच सौ. दीपा नरेवाडी होत्या.
प्रारंभी सर्वांचे स्वागत मारुती एच.पी.गॅसच्या तेरणी केंद्राचे प्रमुख रियाज जमादार यांनी केले. यावेळी हलकर्णी मारुती एच.पी.गॅसचे प्रमुख अविनाश दुध्यागोळ यांनी गॅस सिलिंडर वापरताना कोणती काळजी घ्यावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास गुलाब मुल्ला, मारुती एच.पी.गॅसच्या तेरणी केंद्राचे प्रमुख रियाज जमादार यांच्यासह महिला उपस्थित होत्या.


