Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महागाव, भडगाव, बड्याचीवाडी, हसुरवाडी, हरळी खुर्द ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर

                   छायाचित्र: अशपाक किल्लेदार 

👤संतोष नाईक/गडहिंग्लज 

गडहिंग्लज तालुक्यात महागाव, भडगाव, बड्याचीवाडी, नेसरी, हसुरवाडी, कडगाव, हरळी खुर्द, कवळीकट्टी यासह जवळपास वीस ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाल्याचे दिसून आले. त्याचबरोबर काही ग्रामपंचायतींमध्ये स्थानिक आघाड्यानीही यश मिळवले आहे. यापूर्वी बटकणंगले, कडाल, कडलगे, कौलगे या चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. निकाल पाहता तालुक्यात सरपंच पदाच्या निवडणुकीत समविचारी आघाडीला 12, राष्ट्रवादी 7, भाजपा 7 तर अप्पी पाटील गटाला दोन, ठाकरे शिवसेना गटाला दोन ठिकाणी यश मिळाल्याचे दिसले.

कडगाव, जखेवाडी, बेकनाळ येथे राष्ट्रवादीला यश मिळाले आहे. कळविकट्टेत समविचारी आघाडीने जोरदार मुसंडी मारली असून भाजपला या ठिकाणी पराभवाला सामोरे जावे लागले आहे . बड्याचीवाडीत मात्र भाजपने सत्ता प्रस्थापित केली आहे. नेसरीत नेसरीकर आघाडीने सत्ता काबीज केली आहे. कुंबळहाळ, येणेचवंडी, वैरागवाडी, काळामवाडी आदी गावांमध्ये सत्ताधाऱ्यांनी सत्ता अबाधित ठेवली आहे.      

तालुक्यातील 30 ग्रामपंचायतींसाठी आज पॅवेलियन हॉल येथे मतमोजणी पार पडली. एकूण 24 टेबलांवर पाच फेरीत मतमोजणी करण्यात आली.

तालुक्यात संवेदनशील असलेल्या महागाव येथे अप्पी पाटील गटाने दहा जागांवर विजय प्राप्त करत तब्बल दहा वर्षानंतर सत्तांतर घडवून आणले. सरपंचपदी देखील अप्पी पाटील गटाचे प्रशांत शिंदे विजय झाले. विरोधी पताडे यांच्या आघाडीला पाच जागा मिळाल्या. या ठिकाणी तिरंगी लढत झाली होती.

                          छायाचित्र: अशपाक किल्लेदार

भडगाव ग्रामपंचायतीत समविचारी आघाडीने दणदणीत विजय मिळवत सत्तांतर घडवून आणले. सरपंच पदाचे उमेदवार वंदना शेंडुरे विजयी झाल्या आहेत. 

हसुरवाडी ग्रामपंचायतीत अप्पी पाटील गटाने पाच जागांवर विजय मिळवत सत्तांतर घडवून आणले. सरपंचपदी देखील अप्पी पाटील गटाच्या कोमल भोसमोडे  या विजयी झाल्या आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादीला एक तर भाजपला एका जागेवर समाधान मानावे लागले.

                      छायाचित्र: अशपाक किल्लेदार

हरळी खुर्द येथे सैनिक संघटनेच्या सरपंच पदाचे उमेदवार साधना आयवाळे विजयी झाल्या आहेत.

कवळीकट्टी येथे समविचारी आघाडीने सत्तांतर घडवत जोरदार मुसंडी मारली आहे. कुंबळहाळ येथे ग्रामदैवत मंगलादेवी समविचारी आघाडीने वर्चस्व प्राप्त केले.  

हसुरसासगिरी येथे सदस्य पदाची निवडणूक बिनविरोध झाली होती. मात्र  सरपंच पदासाठी निवडणूक झाली. यामध्ये महालक्ष्मी ग्रामविकास आघाडीचे प्रदीप कडूकर हे विजयी झाले. वैरागवाडी येथे देखील सदस्य पदासाठी निवडणूक बिनविरोध झाली मात्र सरपंच पदासाठी लढत झाली. यामध्ये पी.के. पाटील हे विजयी झाले.

                छायाचित्र: अशपाक किल्लेदार

तहसीलदार दिनेश पारगे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी केंद्र परिसरात तसेच संवेदनशील गावांमध्ये कडेकोट  पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

लोकनियुक्त सरपंच पुढील प्रमाणे - 

डोणेवाडी- सिकंदर मुल्ला, हडलगे- हणमंत पाटील, काळामवाडी-सरिता लांडे, हिडदुग्गी- संतोष कांबळे, वैरागवाडी- पी.के.पाटील, बिद्रेवाडी- दत्तात्रय गुरव, जखेवाडी- वैशाली गिरी, तारेवाडी- विश्रांती नाईक, शिपुर तर्फ नेसरी- सचिन गुरव, यमेहट्टी- संगीता धुमाळे, सांबरे- ज्योती खराडे, सरोळी-अस्मिता कांबळे, येणेचवंडी- दिपाली कांबळे, खमलेहट्टी- शंकर सुतार, महागाव- प्रशांत शिंदे, कुंबळहाळ- लक्ष्मी पाटील, तावरेवाडी- पूजा वळतकर, बेकनाळ- आनंदा पाटील, कुमरी- कांचन पाटील, कडगाव- अर्चना पाटील, भडगाव- वंदना शेंडुरे, कळविकट्टे- आनंदा पाटील, नेसरी- गिरीजादेवी शिंदे, करंबळी- अनुप पाटील, हिटणी- सविता किल्लेदार, बड्याचीवाडी- बाजीराव खोत, मुगळी- मल्लिकार्जुन आरबोळे, हसुरवाडी- कोमल भोसमोडे, हसुरसासगिरी- प्रदीप कडुकर, हरळी खुर्द- साधना आयवाळे.

महागाव : येथे असा कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.