Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सिक्कीममधील दुर्घटनेत १६ जवान शहीद

सैनिक परिवारावर शोककळा

नवी दिल्ली : उत्तर सिक्कीममधील झेमा येथे दरीत वाहन कोसळून १६ जवान शहीद झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शहीद झालेल्या जवानांमध्ये तीन कनिष्ठ अधिकारी व १३ जवानांचा समावेश आहे.  

याबाबतची अधिक माहिती अशी की, जवानांना घेऊन जाणारे वाहन सिक्कीममधील झेमा येथे एका अवघड वळणावर चालकाचा अचानक ताबा सुटल्याने दरीत कोसळले. या दुर्घटनेत तीन कनिष्ठ अधिकारी (जेसीओ) व 13 जवान शहीद झाले आहेत. जखमी जवानांना तातडीने उपचारासाठी हेलिकॉप्टरने रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

उत्तर सिक्कीममधील झेमा येथे "लष्कराच्या ट्रकला झालेल्या  भीषण अपघातात भारतीय लष्कराच्या 16 शूरवीरांना आपला जीव गमवावा लागला आहे,” असे लष्कराने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी यांच्याकडून शोक व्यक्त  

सिक्कीम मधील या दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले की, "सिक्कीममध्ये झालेल्या रस्ता दुर्घटनेत आपल्या शूर जवानांनी जीव गमावला आहे. त्यांच्या शोकाकुल कुटुंबियांच्या दु :खात मी सहभागी आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.