Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नौकुड गावच्या सुपुत्राचा राष्ट्रीय "तायक्वांदो"मध्ये डंका

तन्मय बिरंजे याने मिळविले सुवर्णपदक

नौकुड गावच्या शिरपेचात मानाचा तुरा


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
कोलकत्ता येथे पार पडलेल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत मूळचा नौकुड येथील व सध्या मुंबई येथे राहणाऱ्या तन्मय इराप्पा बिरंजे याने सुवर्णपदक पटकावत यशाला गवसणी घातली. त्याच्या या यशाबद्दल नौकुड गावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.    

नौकुड गावचे सुपुत्र इराप्पा शंकर बिरंजे हे 1979 झाली उदरनिर्वाह करण्यासाठी नौकुडमधून मुंबईला गेले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत  दिवस काढून त्यांनी आपल्या मुलांना उत्तम प्रकारे शिक्षण दिले. आज त्यांचा मुलगा तन्मय याने राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवून त्यांच्या या कष्टाचे चीज केल्याने त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

तन्मय बिरंजे याने अथक परिश्रमाच्या जोरावर कोलकत्ता येथे पार पडलेल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेतील ५० किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. यावेळी तन्मय याला या यशाबद्दल सन्मानपूर्वक सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. 

तन्मय याने मिळवलेल्या या यशाने नौकुड गावात आनंदाचे वातावरण असून सरपंच शुक्राचार्य चोथे, सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी तन्मयला शुभेच्छा देत त्याचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.