गडहिग्लज (प्रतिनिधी): संभाजीराव माने ज्युनिअर कॉलेजच्या एन.एस.एस.च्या स्वयंसेवकांनी मांगनुर तर्फ सावतवाडी गावातील पाणंद रस्ता स्वच्छता, त्याचबरोबर गावातील शाळेसमोरील हिंदमाता सोसायटीच्या मोकळ्या परिसरातील मुलांसाठी ग्राउंडची स्वच्छता, पाण्याच्या टाकीकडे जाणारा रस्ता, बाळगोंड पाटील उद्यान, जॅकवेल व फडके शेताकडील रस्ता या सर्वांची स्वच्छता करून संपूर्ण गावाला मोकळा श्वास घेण्यासाठी खुले केले आहे.
या शिबिरामध्ये विद्यार्थी- विद्यार्थिनीनी एन.एस.एस.च्या शिबिरातून स्वयंसेवकांनी संपूर्ण गावाला स्वच्छतेतून आपला गाव आनंदाने मोकळा श्वास घेऊ शकतो हा विश्वास ग्रामस्थांना दिला आहे. या शिबिरार्थीनी गावात केलेल्या या कामाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांच्या मार्गदर्शनाने व सरपंच सौ शारुबाई चव्हाण, उपसरपंच प्रकाश पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, हिंदमाताचे चेअरमन शंकर सावंत, व्हाईस चेअरमनदिनकर शिंगटे, हायकोर्ट वकील आर.आर.शिंगटे, शामराव शिंदे, पोस्टमास्तर तुकाराम शिंदे, सचिन घुगरे, समीर चव्हाण, दिनकर फडके, मुंबईकर ग्रामस्थ सर्व गावकरी, भावेश्वरी दुघ संस्था, जयकिसान दुध संस्था, तरुण मंडळे यांच्या बहुमोल सहकार्याने राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.एम.एस.घस्ती, सहाय्यक अधिकारी प्रा.संजय कांबळे, प्रा. रेश्मा सावरतकर यांनी शंभर स्वयंसेवकांची टीम घेऊन संपूर्ण गावातील स्वच्छता करून संपूर्ण गावाचा नूर बदलला आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराच्या माध्यमातून संपूर्ण गावाची स्वच्छता करून विद्यार्थ्यांनी सामाजिकता जपली आहे. त्यांनी केलेले हे कार्य खरोखरच कौतुकास्पद असल्याचे उपसरपंच प्रकाश पाटील यांनी व्यक्त केले.
या संपूर्ण गावासाठी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांनी स्वतः लक्ष घालून ही स्वच्छता मोहीम राबवून संपूर्ण गावासाठी विद्यार्थ्याच्या माध्यमातून योगदान देण्यासाठी हा उपक्रम अधिक गतिमान केला आहे अशी भावना प्रकाश पाटील यांनी व्यक्त केली.




