Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महागावच्या महात्मा फुले विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
येथील महात्मा फुले विद्यालय व जुनिअर कॉलेजच्या वतीने 'कलाअविष्कार २०२३' -वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. दोन दिवस विविध कार्यक्रम संपन्न झाले. त्यामध्ये फॅन्सी ड्रेस,फनी गेम्स, व्याख्यान, शेलापागोटे व विविध कला गुणदर्शनाचा समावेश होता.

यावेळी विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे उदघाटन माजी जि.प.सदस्य हणमंतराव पाटील व अजित देसाई यांच्या हस्ते झाले.अध्यक्षस्थानी प्राचार्य आय. एस. पाटील तर प्रमुख पाहुणे सरपंच प्रशांत शिंदे उपस्थित होते. माजी सभापती विजयराव पाटील, श्रीशैल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

महागाव : वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त अहवाल वाचन करताना प्राचार्य आय. एस. पाटील. सोबत हणमंतराव पाटील, विजयराव पाटील, अजितराव देसाई, श्रीशैल पाटील यांच्यासह अन्य मान्यवर.
पहिल्या दिवशी फॅन्सी ड्रेस,फनी गेम्स तर दुसऱ्या दिवशी अभिनेते आत्माराम पाटील यांचे विनोदी व्याख्यान व सायंकाळी विविध कलागुणदर्शनाचे आयोजन केले होते. या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्याने आधुनिक गीताबरोबर पारंपरिक कोळी, शेतकरी, वाघ्यामुरळी, गोंधळ, लावणी, देशभक्तीपर गीते, नाटिका व रिमिक्सच्या ठेक्यावर विद्यार्थ्यांनी आपला कलाविष्कार दाखवला.

यावेळी उपसरपंच संदीप कोकितकर, संस्था प्रतिनिधी आण्णासाहेब पाटील, ग्रा.पं. सदस्य ह्रदयनाथ सोमशेट्टी, सुरज आसवले, विकास इंगवले,परशुराम हुले, गौराबाई निकम, वैशाली पाटील, समिना बागवान,अनिता रेडेकर, हसीना सोलापुरे, फिरोज सोलापुरे, माजी कॅप्टन महादेव घुगरे,आदी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक प्रा.पी.डी. पाटील, सूत्रसंचालन प्रकाश चौगुले यांनी केले. आभार प्रा.भीमराव मनगुत्ती यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.