गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालय व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरविद्यापीठ शरीरसौष्ठव स्पर्धेत ७५ ते ८० किलो वजनी गटात शिवराज महाविद्यालयाचा ओंकार पाडळकर सुवर्णपदक विजेता ठरला. स्पर्धेसाठी विविध महाविद्यालयातील ९० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतून 'ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी'साठी खेळाडूंची निवड करण्यात आली.
वजन गटनिहाय अनुक्रमे विजेते पुढील प्रमाणे : ६० किलो- अवधूत निगडे - आसुर्ले-पार्ले कॉलेज, रोशन वेदांते जी.के.जी कॉलेज, कोल्हापूर, विनायक शिंडकर-एन.पाटील कॉलेज सांगली, ६०-६५ किलो- विशाल पाटील- विठ्ठलराव पाटील कॉलेज कळे, अनिल मोहनगेकर- कोवाड महाविद्यालय,अनिकेत दाते-एस.बी.एस कराड, ६५-७०किलो- अर्जुन मोंगले, डांगे कॉलेज हातकणगंले, रुषाल पोवार, कॉमर्स कॉलेज कोल्हापूर, ओमकार भांडेगरी- दुधसाखर बिद्री, ७०-७५ किलो-रोहित भोगण, कोवाड कॉलेज, प्रणव कांबळे -शहाजी कॉलेज कोल्हापूर, ओम पाटील-एन.डी.पी.एन.सांगली, ७५-८० किलो-ओमकार पाडळकर-शिवराज कॉलेज गडहिंग्लज, अमन कुटे-एस.व्ही.एम.इचलकरंजी, वरदराज पाटील डी.एस.सी.कराड, ८०-८५ किलो- सुमित सुतार-साधना कॉमर्स गडहिंग्लज, मनीष सुतार- एन.डी.पाटील कॉलेज सांगली, आशिष पाटील- शिवराज कॉलेज गडहिंग्लज, ८५-९० किलो-प्रशांत भोसले-विवेकानंद कॉलेज कोल्हापूर, विजय शिंडकर- एन.डी.पी.एन.सांगली, प्रसाद कुंभार -शिवाजी विद्यापीठ, ९० किलो-युवराज खोत- शिवराज कॉलेज गडहिंग्लज, पृथ्वीराज उनाळे-डी.वाय.पी.कॉलेज साळोखेनगर.
प्रास्ताविक क्रीडा विभाग प्रमुख डॉ. राहुल मगदुम यांनी केले. या स्पर्धेचे उदघाटन शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शरीरसौष्ठव स्पर्धेचे ज्येष्ठ पंच प्रा.के.बी.केसरकर, संस्थेचे उपाध्यक्ष अॅड.दिग्विजय कुराडे, प्रा.विश्वजित कुराडे, माजी विद्यार्थी 'शिवराज'श्री संजय धुरे, भारतश्री अजिंक्य रेडेकर, विजय मोरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात शरीरसौष्ठव स्पर्धेतून विद्यार्थ्यांना ऑलपिंक स्पर्धेतून चमकण्याची संधी आहे. खेळाडूंनी ही संधी न दवडता आपल्या देशाचे नाव या खेळातून चमकविणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने खेळाडूंनी तयारी करावी तसेच अशा होतकरू शरीरसौष्ठवपटूंना घडविणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा.के.बी.केसरकर यांनीही खेळाडूंना मार्गदर्शन केले.
शिवाजी विद्यापीठ निवड समितीचे डॉ.प्रशांत पाटील, प्रा. रवि चव्हाण, प्रा.विक्रम यमगेकर, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम, विविध महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक, यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. प्रा.अशोक मोरमारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून रवींद्र आरते, रामचंद्र चितळे, विवेक संकपाळ सांगली व विजय मोरे, राहुल परीट, राजेश वडाम, दीपक माने, सचिन चांदेकर, ओम सातपुते, संदीप यादव, रवी चौगुले कोल्हापूर यांनी काम पाहिले. आभार प्रा.जयवंत पाटील यांनी मानले.



