Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजला नाट्य महोत्सवाला सुरुवात

गडहिंग्लज: नाट्य महोत्सवाचे उदघाटन करताना उपविभागीय अधिकारी  बाबासाहेब वाघमोडे. यावेळी उपस्थित माजी नगराध्यक्षा सौ. स्वाती कोरी, गटविकास अधिकारी शरद मगर, मुख्याधिकारी स्वरूप खारगे, माजी नगरसेवक हारुण सय्यद आदी.
                                                (छायाचित्र: मज्जिद  किल्लेदार) 

गडहिंग्लज (प्रतिनिधी):
गडहिंग्लज नगरपालिका व कला अकादमी यांच्यावतीने आयोजित नाट्य महोत्सवाचे उदघाटन उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या हस्ते करण्यात आले. नाट्य महोत्सवाची सुरुवात 'गगन दमामा बाज्यो' या शहीद भगतसिंगांच्या जीवनावर आधारित नाटकाने करण्यात आली. सदर नाट्यमहोत्सव हे बॅरिस्टर नाथ पै विद्यालयाच्या जनता खुले नाट्यगृह येथे सुरू आहे. हे नाट्य महोत्सव तीन दिवस चालणार आहे.

प्रारंभी प्रास्ताविक नगरपालिकेचे मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांनी केले. यावेळी नाटकाचे दिग्दर्शक शंतनू पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास गटविकास अधिकारी शरद मगर, माजी नगराध्यक्ष सौ. स्वाती कोरी, माजी नगरसेवक हारूण सय्यद यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

 'गगन दमामा बाज्यो' नाटकातील क्षणचित्रे... 👇🏼















Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.