विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती रत्नमाला घाळी यांचे निधन
उद्या सकाळी ११:३० वाजता होणार अंत्यसंस्कार
गडहिंग्लज (प्रतिनिधी): विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती रत्नमाला घाळी यांचे सोमवारी सायंकाळी ४ वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाने गडहिंग्लज तालुक्यावर शोककळा पसरली आहे. माजी आमदार डॉ.एस.एस.घाळी यांच्या त्या पत्नी होत.
अत्यंदर्शनासाठी पार्थिव उद्या (मंगळवारी) सकाळी ७ ते ११ पर्यंत शिवयोगी बंगला, गांधीनगर येथे ठेवण्यात येणार आहे. अंत्यसंस्कार सकाळी ११.३० वाजता बेलबाग येथे होणार आहे.

