गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव येथील केंद्रशाळेतील कन्या व कुमार विद्या मंदिरच्या चिमुकल्याने वार्षिक स्नेहसंमेलनात कलाविष्कारांचे सादरीकरण करत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे सरपंच प्रशांत शिंदे उपस्थित होते.
या स्नेहसंमेलनाचे उदघाटन ग्रामपंचायत सदस्य संदीप कोकितकर, दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन सदस्या कमल पताडे यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक रेश्मा पोटे यांनी केले. यावेळी संदिप कोकितकर, अर्जुन दिवटे यांनी मनोगत व्यक्त केले.
या स्नेहसंमेलनात चिमुकल्याने आधुनिक गीताबरोबर पारंपरिक कोळी, शेतकरी, वाघ्यामुरळी, गोंधळ, लावणी, देशभक्तीपर गीतांच्या विविधरंगी कलाविष्कारातून महाराष्ट्राची संस्कृती प्रेक्षकांसमोर उभी केली. यावेळी ग्रा.पं. सदस्य ह्रदयनाथ सोमशेट्टी, विकास इंगवले, परशुराम हुले,अख्तर बागवान, गौराबाई निकम, वैशाली पाटील, समिना बागवान, अनिता रेडेकर, हसीना सोलापुरे ,सरिता कोले, अन्नपूर्णा सोमशेट्टी,फिरोज सोलापुरे, माजी कॅप्टन महादेव घुगरे, मुख्याध्यापिका अप्रोज पठाण,पो.पाटील विनिया सावंत, कुमार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल घेवडे,कन्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असिफ खलीफ, नजीर बागवान, प्रवीण तौकरी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रेश्मा पोटे व नंदा सुतार यांनी केले. आभार केंद्रप्रमुख अनिल बागडे यांनी मानले.



