गडहिंग्लज (प्रतिनिधी): राज डावरे यांनी मुलींच्या हायस्कूल शेजारी राबवलेल्या संजीवनी कृषी प्रदर्शनाचे उदघाटन शिवसेना कोल्हापूर शहरप्रमुख रविकिरण इंगवले, जिल्हा प्रमुख विजय देवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. १० जानेवारीपर्यंत हे कृषी प्रदर्शन सुरू राहणार आहे.
यावेळी उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर, सहसंपर्क प्रमुख सुनील शिंत्रे, रियाजभाई शमनजी, नगरसेवक संभाजी पाटील, युवा सेना जिल्हा प्रमुख अवधूत पाटील, उपजिल्हा प्रमुख प्रतीक क्षीरसागर, महिला जिल्हाप्रमुख शांता जाधव, गडहिंग्लज तालुका प्रमुख दिलीप माने, शहरप्रमुख संतोष चिकोडे, उपशहरप्रमुख काशिनाथ गडकरी, संदीप कुराडे, वसंत नाईक, महादेव पाटील, संभाजी येरुडकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थिती होते.
या प्रदर्शनाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन संजीवनी कृषी प्रदर्शनाचे संयोजक राज डावरे यांनी केले आहे.

