Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज महाविद्यालयात मराठी भाषा पंधरवडानिमित्त काव्यवाचन संपन्न


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
येथील शिवराज महाविद्यालयात मराठी भाषा पंधरवडानिमित्त काव्यवाचन कार्यक्रम संपन्न झाला. अध्यक्षस्थानी रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.ए.एम.हसुरे होते तर संस्था सचिव डॉ.अनिल कुराडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक डॉ.आनंदा कुंभार यांनी केले. या कार्यक्रमात संस्था सचिव डॉ.अनिल कुराडे यांनी मराठी भाषा आपली मातृभाषा आहे. मराठी भाषेतून व्यक्त होणाऱ्या भावना या परस्परांशी सुहृदयता जपणाऱ्या आहेत. मराठी भाषेत एक प्रकारचा गोडवा आहे. हा गोडवा काव्याच्या माध्यमातून अधिक फुलविण्याचा प्रयत्न कवींनी केला आहे. अशी ही गोड आणि मधुर मराठी भाषा टिकविण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे असे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमात पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ.सुधीर मुंज, पर्यवेक्षक प्रा.टी.व्ही.चौगुले, प्रा.अशोक मोरमारे, प्रा.पौर्णिमा कुराडे, माजी विद्यार्थिनी कु.तेजस्विनी पाटील, संतोष पाटील, अनिल कलकुटकी यांच्यासह विद्यार्थ्यांनी काव्यवाचन केले. या कार्यक्रमास डॉ.श्रद्धा पाटील यांच्यासह अन्य प्राध्यापक, विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अशोक मोरमारे यांनी केले तर पर्यवेक्षक प्रा.टी.व्ही.चौगुले यांनी आभार मानले.





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.