गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव ( ता.गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नागपूर येथे झालेल्या बहात्तराव्या इंडियन फार्मास्युटिकल परिषदेत सहभाग घेत विविध माहिती आत्मसात केली. तब्बल एक्केचाळीस वर्षांनंतर येथे ‘इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस असोसिएशन’ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या ‘फार्मास्युटिकल सायन्स’ विभागाच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
या परिषदेचे उदघाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. या परिषदेत व्याख्याने झाली. यासाठी जागतिक स्तरावरील नामवंत तज्ञाची उपस्थीत होती. ‘गुणवत्तापूर्ण आणि परवडणारी वैद्यकीय उत्पादने सहज प्राप्त करता येणे’ या विषयावर ही परिषद होती. तीन दिवसांच्या या परिषदेत आत्यधुनिक वैद्यकीय उपकरणे, फार्मा मशिन्स, प्रयोगशाळेतील उपकरणे, औषध उत्पादने, पुस्तके व विशेषांक नवीन उत्पादने व इतर तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करण्यात आले होते. दरम्यान विविध विषयांवर चर्चासत्र, परिसंवाद पार पडले.
या परिषदेमध्ये सहभागसाठी प्राचार्य डॉ.एस.जी.किल्लेदार यांचे मार्गदर्शन मिळाले. तर प्रा.अभिनंदन आलमन, प्रा.क्रांती बिल्ले, प्रा. कैवल्य मिरजकर यांनी विशेष परिश्रम घेतले.


