Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महागाव येथील अवलिया गैबिवली देवाचा उद्यापासून उरूस

हिंदू - मुस्लिम ऐक्याचे प्रतीक

विविध धार्मिक कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन 


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
हिंदू - मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला येथील अवलिया गैबिवली देवाचा उरूस दि.२२,२३, व २४ रोजी होत आहे.त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन केले आहे.त्यानिमित्त बुधवार दि.२२ रोजी दस्तगीर सोलापुरे यांच्या घरातून संदल ( गंध) मिरवणूक ,गुरूवार २३ रोजी भर ऊरुस, बाबासाहेब मगदूम यांच्या घरातून देवाचा पहिला नैवेद्य तर शुक्रवार २४ रोजी भाऊसाहेब कांबळे यांच्या घरातून गलेफ व विठ्ठल चौगुले यांच्या घरातून झेंडा मिरवणूक असणार आहे.

गुरुवार दिनांक 23 रोजी सकाळी नऊ वाजता धावणे स्पर्धा  (17 वर्षा खालील मुले व मुली) होणार असून यासाठी प्रथम क्रमांक 1111, द्वितीय क्रमांक 777, तृतीय क्रमांक 555 अशी बक्षिसे आहेत.

सकाळी 10 वाजता सायकल स्पर्धा आयोजित केली असून यासाठी प्रथम क्रमांक 1111,  द्वितीय क्रमांक 777, तृतीय क्रमांक 555 अशी बक्षिसे आहेत. 

हातात कासरा धरून बैल पळवणे स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक 2222, द्वितीय क्रमांक 1515, तृतीय क्रमांक 1111 अशी बक्षिसे आहेत.

दुपारी तीन वाजता नवतर व जनरल घोडा गाडी स्पर्धा आयोजित केली असून यासाठी प्रथम क्रमांक 3001, द्वितीय क्रमांक 2001, तृतीय क्रमांक 1001 अशी बक्षीस आहेत.

जनरल घोडागाडी शर्यतीसाठी प्रथम क्रमांक- 5555, द्वितीय क्रमांक 3333, तृतीय क्रमांक 2222 अशी बक्षिसे आहेत.

4 वाजता एक पाडा व एक बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले असून 4.30 वाजता खुल्या बैलगाडी शर्यत होणार आहेत. यासाठी प्रथम क्रमांक 11111, द्वितीय क्रमांक 7777, तृतीय क्रमांक 5555 अशी आकर्षक बक्षिसे आहेत.

भव्य बिन दाती, दोन दाती, चार दाती, सहा दाती ओपन मेंढा  टक्करी- प्रथम क्रमांक 1111, द्वितीय क्रमांक 7777, तृतीय क्रमांक 5555 अशी बक्षिसे आहेत.

तरी या सर्व धार्मिक कार्यक्रम व स्पर्धांसाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन उरूस कमिटीचे अध्यक्ष फिरोज सोलापुरे,उपाध्यक्ष श्रीकांत मांगले व सचिव अशपाक मुरसल यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.