कोल्हापूर: बाळासाहेबांची शिवसेना चंदगड तालुक्यातील पदाधिकारी यांनी जिल्हा प्रमुख राजेखान जमादार यांच्या नेतृत्वाखाली कामगार आयुक्त आशिष घोडके यांची भेट घेऊन चंदगड तालुक्यातील बांधकाम कामगार यांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली..या वेळी चंदगड तालुक्यातील सर्व प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
यावेळी बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख राजेखान जमादार, तालुका प्रमुख कल्लापान्ना निवगीरे, दिवाकर पाटील, जय महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेचे प्रमुख एकनाथ गुरव, उपतालुकाप्रमुख प्रमुख श्री.दत्ता पाटील, बांधकाम कामगार सेनेचे प्रमुख पुंडलिक पाटील, दिपक पवार, वाहतूक सेना उपतालुकाप्रमुख प्रमुख सलिम मुल्ला व पदाधिकारी उपस्थित होते.

