Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महागावच्या गावसभेत विविध विषयांवर चर्चा

ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

जल जीवन मिशन अंतर्गत कामांना सुरुवात करण्याचा निर्णय

महागाव : येथील गावसभेत ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सरपंच प्रशांत शिंदे,उपसरपंच संदीप कोकितकर,सोबत सुरज आसवले,हृदयनाथ सोमशेट्टी, आर. व्ही. पाटील आदी.

गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव ग्रामपंचायतीत सत्तांतर झाल्यानंतर सरपंच, उपसरपंच, आणि सदस्यांची पहिलीच गावसभा पार पडली. यावेळी विषय पत्रिकेवरील काही महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली. ग्रामस्थांनी या गावसभेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.अध्यक्षस्थानी सरपंच प्रशांत शिंदे होते.

स्वागत ग्रामपंचायत सदस्य हृदयनाथ सोमशेट्टी यांनी केले. ग्रामविकास अधिकारी संदीप धनवडे यांच्या अनुपस्थितीत ग्रामसेवक आर. व्ही.पाटील यांनी विषय पत्रिकेचे व मागील सभेचे प्रोसिडिंगचे वाचन केले. यावेळी गडहिंग्लज पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता पी.के. चौगुले उपस्थित होते. 

 या ग्रामसभेत जल जीवन मशीन योजना,स्वच्छ भारत अभियान, शासनाच्या परिपत्रकाचे वाचन, आयत्यावेळी आलेल्या विषयाची वाचन,थकीत घरपट्टी, पाणीपट्टी ,लाईट बील आदी विषयावर चर्चा झाली.

ऐनवेळी आलेल्या विषयात नदीवरील निकृष्ट बांधकाम झालेल्या इंटेकवेल कामाच्या दर्जाबाबत चौकशी करणे, जलजीवन मिशन अंतर्गत कामे सुरू करण्यास परवानगी देणे, आठवडा बाजार पूर्वीच्या ठिकाणी भरवणे,स्वस्त धान्य दुकान,आदी विषयावर जोराची चर्चा झाली.

 सभेत सरपंच प्रशांत शिंदे, उपसरपंच संदीप कोकितकर ,शाखा अभियंता पी. के.चौगुले यांनी ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर दिले. ठेकेदार नारायण दळवी, राजू पोवार यांनी जलजीवन मशीन योजनेचे काम दर्जेदार करण्याचे आश्वासन दिले. या चर्चेत ग्रा.पं. सदस्य हृदयनाथ सोमशेट्टी, सुरज आसवले, विकास इंगोले, शिवाजीराव माने, गुलाब मुगळे, फिरोज सोलापुरे, शिवाजी शिंगटे, मनोहर देसाई, सुनील पट्टणशेट्टी, अर्जुन रेडेकर, संजय गडकरी, महम्मद पठण,नजीर बागवान, दिग्विजय देसाई आदींनी सहभाग घेतला.

यावेळी ग्रा.पं.सदस्य परशुराम हुले, आक्तर बागवान, वैशाली पाटील, समीना बागवान, अनिता रेडेकर, सरिता कोले, अन्नपूर्णा सोमशेट्टी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.