![]() |
| (छायाचित्र: मज्जिद किल्लेदार) |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठ सेवक संयक्त कृती समितीच्या निर्देशानुसार राज्यातील महाविद्यालयीन व विद्यापीठ शिक्षक कर्मचाऱ्यांच्या "न्याय व रास्त मागणीच्या पूर्ततेसाठी" शिवराज महाविद्यालय गडहिंग्लज येथील प्रशासकीय सेवकांच्या वतीने आज दिनांक 20 फेब्रुवारी पासून राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यासाठी महाविद्यालयाच्या गेटवर महाविद्यालय प्रशासकीय कर्मचारी बेमुदत संपात सहभागी झाले आहेत.
महाविद्यालयाचे रजिस्ट्रार संतोष शहापूरकर, कुमार कुंभार, रतन जाधव, संदीप शिंदे, नेताजी कांबळे, अशोक पोवार, राजू जाधव, सुरेश खोत, विजय कोंडूसकर, सुरेश मोरबाळे यांच्यासह सर्व कर्मचारी सहभागी झाले आहेत.
यावेळी फुले आंबेडकर शाहू टीचर असोसिएशन (फास्टा), शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघटना (सुटा) यांच्यावतीने जाहीर पाठिंबा दिला आहे. फुले आंबेडकर शाहू टीचर असोसिएशन (फास्टा) प्रा.जयकुमार सरतापे, शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघटना (सुटा)चे प्रा किशोर अदाटे, शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिलराव कुराडे यांनी मार्गदर्शन करुन संपास जाहीर पाठिंबा दिला.
यावेळी डॉ.सुधीर मुंज, डॉ. मनमोहन राजे, प्रा अशोक मोरमारे, डॉ.ए.एम.हसुरे, डॉ.राजेंद्र गुंडे, डॉ.एन.आर.कोल्हापूरे, डॉ.जी.जी.गायकवाड, प्रा.एन.बी.ईकीले, डॉ.ए.जी.हारदारे. ग्रंथपाल संदीप कुराडे, डॉ. राहूल मगदूम, डॉ.महेश चौगुले यांच्यासह प्राध्यापक यांनी संपास पाठिंबा दिला.
ज्युनिअर विभागाचे पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले व सर्व शिक्षकांनीही आंदोलनास सक्रिय पाठिंबा दिला.



