Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज हायस्कूलचे एन.एम. एम.एस परीक्षेत यश

३८ विद्यार्थी झाले उत्तीर्ण

७ विद्यार्थी १०० पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण  

                                          (छायाचित्र: मज्जिद किल्लेदार)

गडहिंग्लज (प्रतिनिधी):
येथील गडहिंग्लज हायस्कूलचा एन.एम. एम.एस (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक) परीक्षेचा निकाल उत्कृष्ट लागल्याची माहिती प्राचार्य पंडित पाटील यांनी दिली.

विद्यालयातील परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी ३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ७ विद्यार्थी १०० पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. शंभर गुणांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये निरुपम कुरुणकर, तनिष कुंभार, सोहम खोत, निकिता रेडेकर, चैतन्य शिंदे, दर्शना गिडोळे, सई सावंत यांचा समावेश आहे.

सर्व विद्यार्थ्यांना अजित पाटील, तानाजी पाटील, श्रीमती उज्वला पाटील, लता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षक व पालकांचे प्राचार्य पंडित पाटील व पर्यवेक्षक सुनील कांबळे यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.