Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जिल्हा बँकेच्या हरळी शाखेवर टाकलेल्या 'ईडी'च्या छाप्याची दिवसभर चर्चा


गडहिंग्लज (प्रतिनिधी) :
'ईडी'च्या अधिकाऱ्यांनी गडहिंग्लज तालुक्यातील हरळी बुद्रुक येथील साखर कारखान्या नजीक असलेल्या कोल्हापूर जिल्हा बँकेच्या शाखेवर छापा टाकत चौकशी केल्याने दिवसभर तालुक्यात याची चर्चा सुरू होती. या छाप्यात अधिकाऱ्यांच्या पथकाला कोणती महत्वपूर्ण माहिती व नेमके काय सापडले याचा तपशील मात्र मिळू शकला नाही. 

ईडीच्या पथकाने आज सकाळी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर कोल्हापूर येथे छापा टाकला. त्या पाठोपाठ जिल्हा बँकेच्या गडहिंग्लज तालुक्यातील हरळी कारखाना नजीक असणाऱ्या जिल्हा बँकेच्या शाखेवर देखील छापा टाकत चौकशीचे सत्र सायंकाळी उशिरापर्यंत सुरू ठेवला होता. जवळपास पाच ते सहा अधिकाऱ्यांच्या या पथकाने चौकशी व तपासणी केली. या कारवाईवेळी या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्यांना मज्जाव करण्यात आला. या कारवाईवेळी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून बंदोबस्तासाठी सीआरपीएफचे जवान कार्यालयाबाहेर तैनात करण्यात आले होते. यापूर्वी दिनांक ११ जानेवारी रोजी ईडीच्या पथकाने माजी मंत्री व आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागल, पुणे येथील निवासस्थानी तसेच सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यावर छापा टाकला होता. त्यानंतर आता पुन्हा जिल्हा बँकेसह शाखांवर छापा टाकल्याने खळबळ उडाली आहे. या अधिकाऱ्यांच्या हाती नेमके काय लागले? हे मात्र समजू शकले नाही.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.