Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज नगरपालिकेच्या २ कोटी ३५ लाखाच्या टेंडरची चौकशी करा

मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांची मागणी

उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन सादर 


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
गडहिंग्लज नगरपालिकेने अलिकडेच विविध ३८ कामांची २ कोटी ३५ लाखांच्या खर्चाचे टेंडर काढले आहे. हे टेंडर आपल्या सग्या- सोयऱ्यांना  देण्याच्या उद्देशाने प्रसिध्दी करत तसा प्रयत्न केला आहे.त्यामुळे या टेंडरची चौकशी करावी अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे. 

या निवेदनात म्हटले आहे की, सदर टेंडर प्रसिध्द करीत असताना नियमातील अडचणीचा फायदा उठवत काम झाल्याचा संशय आहे. कारण  मोजक्याच खपाच्या दैनिकात सदर टेंडर प्रसिध्द केले आहे. आता पर्यंत अशा कोणत्याच जाहिराती सदर दैनिकाला दिली नसल्याचे समजते. मग २ कोटी ३५ लाखाच्या मोठया टेंडरची जाहिरात अशा दैनिकाला देण्या मागचा उद्देश काय ? असा प्रश्‍न या निवेदनात उपस्थित केला आहे.

०१ ते ३८ अशी कामाची ही टेंडर आहेत. या मध्ये विविध रकमेची एकूण २ कोटी ३५ लाखाची रक्‍कम होती आहे. प्रत्येक टेंडर वेगळे आहे असा खुलासा नगरपालिका करीत असेल तर संपुर्ण टेंडरला सलग १ ते ३८ कमांक कसे ?  प्रत्येक टेंडरची वेगळी जाहिरात नगरपालिकेने का दिली नाही ? अधिक खपाच्या दैनिकाऐवजी गडहिंग्लजला कमी प्रति येणा-या दैनिकाला जाहिरात देण्यामागे उद्देश काय ?, नगरपालिकेने अशा किती जाहिराती सदर दैनिकाला दिल्या याची माहिती घ्यावी, टेंडरमध्ये पारदर्शकता जपण्यासाठी जाहिरात देताना दुजाभाव का झाला ? प्रसिध्द टेंडरमध्ये सलग १ ते ३८ अशी कामे नोंद असताना प्रत्येक टेंडर स्वतंत्र आहे हे कशावरून? आदी प्रश्न या निवेदनात उपस्थित करण्यात आले आहेत  

सदर टेंडर रद्द करून याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनातून केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील दिला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.