Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते अजित पवार सभागृहात आक्रमक

अवकाळी पावसासह गारपीटीने राज्यात पीकांचे अतोनात नुकसान

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार असंवेदनशील, शासकीय यंत्रणा ठप्प

शेतकरी जगला तरच राज्य जगेल, राज्यातला शेतकरी हवालदिल: विरोधी पक्षनेते अजित पवार


मुंबई :
राज्यात अवकाळी पावसासह गारपिटीच्या घटनेत वाढ झाली आहे. राज्यात पीकांसह, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान खात्याने राज्याला येलो ॲलर्ट दिला आहे. मात्र राज्यातील सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असंवेदनशील आहे, अजूनही अनेक ठिकाणी नुकसानीचे पंचनामे सुरु करण्यात आलेले नाहीत, राज्यातला शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रशासन ठप्प आहे. बाजारभाव, अवकाळी पाऊस यामुळे दुहेरी संकटात असणारा शेतकरी नुकसानीचे पंचनामे होत नसल्याने तिहेरी संकटात सापडला असल्याचा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. तसेच राज्याचे कृषीमंत्री शेतकऱ्यांच्या प्रश्नी काहीही‍ विधाने करुन आकलेचे तारे तोडत असल्याचे सांगून कृषी मंत्र्यांचा चांगलाच समाचार घेतला. 

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, राज्यात दि.5, 6 व 7 मार्च रोजी अवकाळी पाऊस होऊन सर्वच पिकांचे नुकसान झालेले आहे. राज्यातील सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेलेले आहेत त्यामध्ये पंचनामे करणारे ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहाय्यक यांचाही समावेश आहे. त्यामुळे राज्यात नुकसानीचे पंचनामे अद्याप सुरु झालेले नाहीत, ही वस्तूस्थिती आहे. जी आकडेवारी शासन सभागृहात सांगत आहे हे केवळ अंदाजाने आणि कार्यालयात बसून दिलेली आकडेवारी आहे. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी अगोदरच आर्थिक विवंचनेत असताना अवकाळी पावसामुळे अस्मानी संकट उभे राहिले आहे. आगामी चार दिवस राज्यात पावसाळी वातावरण राहणार असून 20 मार्चपासून संपूर्ण राज्याला यलो अलर्ट तर 11 जिल्ह्यांना ऑरेज ॲलर्ट देण्यात आलेला आहे.

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे ‘अवकाळीने शेतीचे फार नुकसान झालेले नाही’ अशी वक्तव्ये करुन आकलेचे तारे तोडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहेत. अवकाळी पाऊसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तातडीने सुरु करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.