महिंद्रा प्राईड क्लासरूम अंतर्गत नंदी फौंडेशन मार्फत आयोजित प्रशिक्षण संपन्न
गडहिग्लज (प्रतिनिधी): शिवराज महाविद्यालयात 'महिंद्रा प्राईड क्लासरूम अंतर्गत नंदी फौंडेशन मार्फत 'बी.सी.ए., बी. सी. एस. आणि बी.एस्सी. कॉम्प्युटर भाग एकच्या विद्यार्थिनीना कंपनीच्या सी.एस.आर.योजनेतून विद्यार्थिनींच्या सक्षमीकरणासाठी सहा दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.एम.कदम तर प्रा.सौ.बिनादेवी कुराडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रारंभी प्लेसमेंट विभागाचे प्रा.बी.एस.पठाण यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. कंपनीच्या प्रशिक्षिका सपना सूद व शिल्पा खुणे यांनी विद्यार्थीनींना सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने व्यक्तिमत्व विकास व कौशल्यपूर्ण प्रशिक्षण दिले. सदर सहा दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थिनींचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या सहा दिवसांच्या प्रशिक्षणातून आपल्याला काय माहिती मिळाली व आलेला अनुभव कु. समृद्धी वाघ, प्राजक्ता पांढरे, आरती पाटील, सलमा सनदी, प्रतीक्षा ढोकरे, प्रियांका खवरे, दीक्षा पाटील, कादंबरी भुइंबर, साक्षी मोहिते, प्रियांका चव्हाण, कु.भक्ती, कु.स्वरूपा तेली आदी विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून व्यक्त करून त्याचा उपयोग आपल्या करिअरसाठी अत्यंत मोलाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
कंपनीमार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थिनी तेजस्विनी हमलदिवटे, सायली भेकणे, समृद्धी वाघ, प्राजक्ता पांढरे, आरती पाटील, प्रतीक्षा ढोकरे, प्रियांका खवरे, कादंबरी भुइंबर, साक्षी मोहिते, प्रियांका चव्हाण, स्नेहल देसाई, प्राजक्ता पाटील, स्वरूपा तेली यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ.एस.एम,कदम यांनी देखील विद्यार्थिनींना सविस्तरपणे मार्गदर्शन केले.
यावेळी बी.सी.ए.विभाग प्रमुख प्रा.के.एस.देसाई, विना-अनुदानित स॒मन्वयक प्रा.आझाद पटेल, बी.एस्सी. (संगणक विभाग) प्रमुख प्रा.दीपिका खांडेकर, प्रा.रवी खोत आदीसह विद्यार्थिनी उपस्थित होते.
या प्रशिक्षणामध्ये १२६ विद्यार्थिनींनी घेतला. प्रा.दीपा महाजन यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आभार प्रा.आय.पी.सुतार यांनी मानले.







