गडहिंग्लज (प्रतिनिधी): योग कल्चर असोसिएशन महाराष्ट्र व कोल्हापूर आणि श्रद्धा योग सेंटर गडहिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १९ मार्च रोजी गडहिंग्लज येथे जिल्हास्तरीय योग स्पर्धा निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे. ही निवड सातारा येथे घेतल्या जाणाऱ्या 12व्या राज्यस्तरीय योगा स्पर्धेसाठी होणार आहे. अशी माहिती योग कल्चर असोसिएशनच्या सचिव डॉ.जयश्री पाटील यांनी दिली.
ही योगा स्पर्धा ६ ते १०, १० ते १५, १५ ते २२, २२ ते ३०, ३० ते ४०, ४० ते ५०, ५० ते ६५, आणि ६५ वर्षांवरील वयोगटासाठी होणार आहे. या स्पर्धेसाठी दोनशे रुपये प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी 89 56 32 63 78 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा ही श्रद्धा योग सेंटर गडहिंग्लज या ठिकाणी होणार आहे.


