Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

निराधारांची पेन्शन तातडीने जमा करा अन्यथा शिवसेनेतर्फे आंदोलन

गडहिंग्लज शिवसेना उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी यांचा इशारा


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांच्या पेन्शनची रक्कम शासनाने तातडीने त्यांच्या खात्यावर जमा करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी यांनी पत्रकातून दिला आहे.

या पत्रकात म्हटले आहे की, संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेअंतर्गत निराधारांना दरमहा पेन्शन दिले जाते. मात्र सदर पेन्शन दोन महिने झाले खात्यावर अद्यापही जमा न झाल्याने लाभार्थी हवालदिल बनले आहेत. दररोज बँकेला हेलपाटे मारून निराधार लाभार्थी मेटाकुटीला आले आहेत. दर महिना येणाऱ्या पेन्शनमधूनच हे निराधार आपला उदरनिर्वाह चालवितात मात्र अद्यापही रक्कम जमा झाले नसल्याने त्यांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. परिणामी उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी शासनाने तातडीने पेन्शन अदा करावी अशी मागणी निराधार लाभार्थ्यातून होत आहे. येत्या पंधरा दिवसात कार्यवाही न झाल्यास शिवसेनेतर्फे आंदोलन करण्याचा इशारा श्री. गडकरी यांनी दिला आहे.

 बातमीचा व्हिडिओ येथे पहा 👇🏼



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.