Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भडगाव ग्रामस्थ बुधवारी साजरा करणार सार्वजनिक विहिरीचा ७२वा वाढदिवस


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
जागतिक जलदिनाचे औचित्य साधून भडगाव येथील सार्वजनिक गोठण विहिरीचा ७२वा वाढदिवस बुधवार दि 22 रोजी सकाळी 9वाजता दरवर्षी प्रमाणे यावर्षीही साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षी भडगाव ग्रामस्थांकडून विहिरीचा साजरा होणारा वाढदिवस हा संपूर्ण जिल्ह्यात कौतुकाचा विषय आहे.

संपुर्ण भडगावकरांची तहान भागविणाऱ्या सार्वजनिक गोठण विहीरीचे गेल्या अनेक वर्षापासुन जागतिक जल दिना दिवशी पूजन केले जाते. या विहीरीचे वैशिष्ट्य म्हणजे सन 1951 साली ही विहीर कोल्हापूर जिल्हा लोकल बोर्डाच्या माध्यमातुन अवघ्या 9998 रूपये इतक्या खर्चात बांधली गेली. विहीरीचे बांधकाम संपुर्णपणे दगडी आहे. या विहीरीची देखभाल दुरुस्ती ग्रामपंचायतीकडुन वेळोवेळी केली जाते.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.