Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अपघातमुक्त सेवा देणाऱ्या ४२ बस चालकांना सुरक्षा पुरस्कार प्रदान

महाराष्‍ट्रातील एकूण सहा चालकांचा समावेश


राज्य परिवहन महामंडळाच्या दोन चालकांचा सन्मान 




नवी दिल्ली : सार्वजनिक वाहतूक सेवेमध्‍ये बस चालवताना सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि रस्ते अपघात रोखण्यासाठी बस चालकांनी केलेल्या  प्रयत्नांचा गौरव करण्‍याच्या उद्देशाने ‘असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग्ज (एएसआरटीयू) ने आज नवी दिल्ली येथे ‘हिरोज ऑन द रोड’ असा पुरस्कार देवून ४२ चालकांचा सत्कार केला. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या सचिव अलका उपाध्याय यांनी त्यांच्या विनाअपघात, निर्दोष  सेवेबद्दल कृतज्ञता म्हणून या कार्यक्रमासाठी देशभरातील  ४२ चालकांना त्यांच्या कुटुंबीयांसह सुरक्षा पुरस्कार प्रदान केले. यामध्‍ये पहिल्या १७ चालकांनी त्यांच्या एकूण सेवेत अपघात न करता ३० वर्ष सेवा दिल्याची नोंद आहे.




या पुरस्कार विजेत्यांमध्‍ये महाराष्‍ट्रातील एकूण सहा  चालकांचा समावेश आहे. यामध्‍ये महाराष्‍ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या दोन चालकांचा सत्कार करण्यात आला. घोडके किसन रामभाउू (36 वर्ष अपघातमुक्त सेवा ) आणि मोहम्मद रफिक अब्दूल सत्तार मुल्ला (29 वर्ष अपघातमुक्त सेवा ) अशी या गुणवंत चालकांची नावे आहेत. तसेच नवी मुंबई महानगरपालिका वाहतूक सेवेतील नंदकुमार लवंड( 26 वर्ष अपघातमुक्त सेवा ) सोलापूर महानगरपालिका वाहतूक सेवेतील आवटे राजेंद्र महादेव (25 वर्ष अपघातमुक्त सेवा ), पुणे म‍हानगर परिवहन महामंडळातील करूण नारायण कुचेकर (24 वर्ष अपघातमुक्त सेवा ), बेस्ट सेवेतील गिरीजाशंकर लालताप्रसाद पांडे (21 वर्ष अपघातमुक्त सेवा ) यांचा आज गौरव करण्‍यात आला.




सध्या, महानगरपालिका अंतर्गत 80 राज्य मार्ग परिवहन उपक्रम  हे एएसआरटीयू चे सदस्य आहेत जे संयुक्तपणे अंदाजे 1,50,000 बस चालवतात आणि सुमारे 70 दशलक्ष प्रवाशांना परवडणारी आणि सुरक्षित वाहतूक सेवा  प्रदान करतात. एएसआरटीयूच्यावतीने प्रामुख्‍याने  मुख्यत्वे सार्वजनिक रस्ते वाहतुकीला प्रोत्साहन देण्‍यासाठी सुधारणा घडवून आणत आहे. तसेच  नवनवीन  घडामोडींवर चर्चा करण्यासाठी, वाहतूकविषयक प्रमुख समस्या/आव्हाने ओळखण्यासाठी विविध बैठका, परिषदा आणि परिसंवाद/कार्यशाळा यांचे आयोजन करत आहे.  राज्य रस्ते वाहतूक उपक्रमांच्या सर्वोत्तम पद्धतींबद्दल माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी एक मंच म्हणून एएसआरटीयू  कार्यरत आहे.




शिक्षण, अभियांत्रिकी (रस्ते आणि वाहने दोन्ही), अंमलबजावणी आणि आपत्कालीन दक्षता, यावर आधारित रस्ता सुरक्षेच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी मंत्रालयाने संबंधित संस्था आणि भागधारकांसह एक बहु-आयामी धोरण तयार केले आहे. एसआरटीयूच्या गाड्यांसंदर्भात रस्ते अपघातांचे प्रमाण खूपच कमी आहे (0.09 अपघात दर) काही एसआरटीयूने शहरी वाहतुकीमध्‍ये  सरासरी 0.09 (हरियाणा, राजस्थान, तामिळनाडू - सेलम, उत्तराखंड, अंदमान आणि निकोबार आणि दिल्ली) पेक्षा खूपच कमी अपघात दर आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.