Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दुगुनवाडी, लिंगनूर तर्फ नेसरी गावांमध्ये भर वस्तीत हत्ती घुसला

ग्रामस्थांची तारांबळ


हत्तीचे शांतपणे गावात वावर 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): तालुक्यातील दुगुनवाडी व लिंगनूर तर्फ नेसरी या दोन गावांमध्ये मंगळवारी रात्री भर मानवी वस्तीत हत्ती घुसल्याने एकच गोंधळ उडाला. या हत्तीने या दोन्ही गावांमध्ये कोणत्याही प्रकारचे मोठे नुकसान केले नसले तरी ऊस व केळी पिकावर ताव मारला आहे. या दोन्हीही गावांमध्ये हत्ती आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.





याबाबतची अधिक माहिती अशी की, मंगळवारी सायंकाळी तालुक्यातील दुगुनवाडी गावात महादेव मंदिर नजीक गावातील एका महिलेला या हत्तीचे दर्शन झाले. ग्रामस्थांना ही माहिती मिळताच सर्वानी त्या दिशेने धाव घेत हत्तीला हुसकावून लावण्यात आले. त्यानंतर हत्तीने दुगुनवाडी- लिंगनूर तर्फ नेसरी रस्त्यावरून  रात्री साडेअकराच्या दरम्यान लिंगनूर तर्फ  नेसरी गावात प्रवेश केला. गावातील भर वस्तीतच हत्ती दाखल झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. हा हत्ती शांतपणे गावातील रस्त्यांवरून वावरताना  दिसत होता. येथून ग्रामस्थांनी हुसकवल्यानंतर उत्तम देसाई व मायाप्पा देसाई यांच्या काजू बागेच्या दिशेने हा हत्ती गेला. रात्रभर या हत्तीने या काजू बागेत मुक्काम ठोकला.





बुधवारी सकाळी नऊच्या दरम्यान पुन्हा या हत्तीने गावात प्रवेश केला. ग्रामस्थांनी येथून पुन्हा हत्तीला हुसकावून लावल्याने तो पुढे बटकणंगले किंवा शेट्टीहळी जंगलाच्या दिशेने गेल्याचा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.