Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

देवस्थान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांचा उत्तुर येथे उद्या मेळावा

आजरा : देवस्थान जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करण्याचा कायदा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ठराव केला आहे; मात्र कायद्यात रूपांतर करण्यासाठी विलंब केला जात आहे. यासाठी सर्वजण एकत्रित येण्याची गरज आहे. यासाठी झालेल्या कामाचा आढावा मांडणी व पुढील दिशा ठरवणे तसेच देवस्थान जमीन करणाऱ्यांच्या नावे करण्यासाठी अर्ज भरणे याकरिता अखिल भारतीय किसान सभा कोल्हापूर यांच्यावतीने उत्तूर येथे सोमवार दिनांक १७ रोजी दुपारी बारा वाजता हनुमान मंदिर उत्तुर येथे जाहीर मेळावा होणार आहे.अशी माहिती कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी दिली.


मेळाव्याला जिल्हा सचिव अमोल नाईक, ऍड. दशरथ दळवी , कॉम्रेड शिवाजी गुरव मार्गदर्शन करणार आहेत. देवस्थान जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.