कोल्हापूर : महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या कोल्हापूर जिल्हा चिटणीस पदी रोहन निर्मळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्तीपत्र अध्यक्ष डॉ. मनोज चव्हाण व सरचिटणीस गजानन राणे यांनी दिले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या कार्यात कामगारांच्या न्याय हक्कासाठी सदैव लढण्याची तत्परता दाखवून सक्रिय राहावे असे या नियुक्तीपत्रात म्हटले आहे.
सदर निवडी ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या आदेशावरून व महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस गजानन राणे, मनसे कोल्हापूर (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे उपाध्यक्ष आण्णासाहेब लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.



