Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तेरणीच्या ए.आर.देसाई हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा पालक मेळावा उत्साहात

इयत्ता दहावीच्या पूर्वतयारीसाठी जादा वर्ग घेण्याचा निर्णय 



गडहिंग्लज (प्रतिनिधी):
तेरणी येथील अशोक रावसाहेब देसाई हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा पालक मेळावा उत्साहात पार पडला. या पालक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डी.वाय.माने तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार संतोष नाईक उपस्थित होते.


प्रारंभी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक शिक्षक बी.एस. गळाटी यांनी केले. पालक मेळावा आयोजित करण्यामागील उद्देश त्यांनी स्पष्ट केला. यावेळी मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक डी.वाय.माने म्हणाले, इयत्ता दहावीचे वर्ष हे विद्यार्थ्यांसाठी फार महत्वाचे असते. येथूनच  विद्यार्थ्यांची दिशा ठरते. त्यामुळे पालकांनी जागरूकपणे आपल्या पाल्यांकडे लक्ष दिले पाहिजे. त्यांच्या अभ्यासातील प्रगती वारंवार शिक्षकांकडून माहिती करून घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिरेक वापर टाळावा.




अभ्यासाकडे लक्ष देऊन प्रगती करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. शिक्षकांबरोबर पालकांनी देखील पाल्यांकडे वेळोवेळी लक्ष दिले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. इयत्ता नववीची परीक्षा संपली असली तरी इयत्ता दहावीची पूर्वतयारी म्हणून सुट्टीच्या कालावधीत जादा वर्ग घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात पालकांनी काही सूचना असल्यास मांडाव्यात असे सांगितले. यावेळी पालकांनी आपली मते मांडली. सुट्टीच्या कालावधीत जादा वर्ग घेण्यास सहमती दिली.




यावेळी शिक्षक एस.एम.कांबळे यांनीही विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. या पालक मेळाव्यास सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. आभार बी.एस.गळाटी यांनी मानले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.