Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आजरा तालुक्यात सशस्त्र दरोडा; दहा लाखाचा मुद्देमाल लंपास

आजरा : आजरा तालुक्यातील रायवाडा येथे मंगळवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडा पडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. चित्री धरणग्रस्त वसाहत येथे ही घटना घडली आहे.


या दरोड्यात चोरट्यानी तब्बल दहा लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. यामध्ये काजूगर, दागिने, रोकड त्याबरोबरच पाळीव डुकरे या चोरट्यांनी चोरून नेली आहेत. प्रल्हाद गुरव यांना शस्त्रांचा धाक दाखवत दरोडेखोरानी हा दरोडा टाकल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.