गडहिग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयात बी.कॉम 2 मध्ये शिकत असलेली कु. तेजस्विनी पंडित चौगुले हिची राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय युवा अभिमत संसदसाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र पातळीवरील या अभिनव उपक्रमासाठी शिवाजी विद्यापीठातून फक्त सहा विद्यार्थी निवडण्यात आले असून कोल्हापूर जिल्ह्यातून दोनच विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे.
कु. तेजस्विनी तिच्या आजोळी अत्याळ या गावी आजीजवळ राहत आहे. तेथूनच आतापर्यंतचा शैक्षणिक प्रवास ती जिद्दीने करीत आहे आणि आपल्या अंगभूत गुणामुळे प्रत्येक ठिकाणी अग्रेसर बनत आहे. तेजस्वीनीचा हा प्रवास आदर्शवत असल्यामुळे या मुलीचा येथून पुढच्या सर्व शिक्षणाची जबाबदारी शिवराज कॉलेजने स्वीकारले असून तिला शिवराज कॉलेजने दत्तक कन्या म्हणून स्वीकारले आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. एम. कदम यांनी दिली आहे.

