Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमत्त गडहिंग्लजला शैक्षणिक साहित्य वाटप



गडहिंग्लज (प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे प्रमुख आमदार सतेज पाटील यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमीत्त कागल विधानसभा मतदार संघ युवक काँग्रेस व शिवराज फौंडेशन यांच्या संयुक्‍त विद्यमाने गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम गोविंदराव माळी हायस्कूलच्या प्रांगणात राबविण्यात आला.


यावेळी मुलांना वह्या, पेन, पुस्तके इत्यादिसह शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सदर उपक्रम गडहिंग्लज साखर कारखान्याचे संचालक ॲड. दिग्विजय कुराडे यांच्या हस्ते करण्यात आला.




या कार्यक्रमाचे आयोजन कागल मतदार संघ युवक काँग्रेसचे अध्यक्ष अक्षय पाटील-गिजवणेकर, सौरभ पाटील नेसरी इत्यांदींनी केले. यावेळी तानाजी चौगुले, विक्रम शिंदे, विश्‍वजित कुराडे, बुलंद पठाण, सुमीत चौगुले, सौ. गौरी शिंदे, अनिल गवळी, संभाजी हजारे यांच्यासह युवक कार्यकर्ते उपस्थित होते. आभार काशीनाथ बारामती यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.