Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तेरणी येथे महालक्ष्मी व करनाईक यात्रेनिमित्त भरगच्च कार्यक्रम

दिनांक २ ते ६ मे या कालावधीत कार्यक्रम होणार संपन्न  




गडहिंग्लज (प्रतिनिधी): तेरणी येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी व श्री. करनाईक यात्रेनिमित्त दिनांक २ ते ६ मे  अखेर विविध धार्मिक कार्यक्रम, स्पर्धा व मनोरंजन असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. यात्रेनिमित्त  गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.



मंगळवार दिनांक २ मे रोजी सायंकाळी सात वाजता महालक्ष्मी देवीची ओटी भरणे, रात्री सव्वा अकरा वाजता रात्रभर देवीची गावातून मिरवणूक, बुधवार दिनांक ३ मे रोजी सकाळी ७ वाजता श्री महालक्ष्मी देवीची प्रतिष्ठापना, दुपारी १२ वाजता महालक्ष्मी व करनाईक देवास नैवेद्य व हवन, शुक्रवार दिनांक ५ मे रोजी सकाळी ९ नंतर देवीस ओटी भरणे, दंडवत व नैवेद्य, शनिवार दिनांक ६ मे  रोजी दुपारी ३ वाजता देवीची मिरवणूक व सायंकाळी ७ वाजता कार्यक्रमाची सांगता होणार आहे.


तेरणी : येथील श्री महालक्ष्मी मंदिर. 


विविध स्पर्धा व मनोरंजनाचे कार्यक्रम


बुधवार दिनांक ३ मे रोजी रात्री १० वाजता महालक्ष्मी मंदिर येथे इब्राहिम जमादार वस्ताद ग्रुप व लक्ष्मीबाई आरभावी यांचे राधा- कृष्ण कन्नड नाटक होणार आहे. याच दिवशी रात्री दहा वाजता बस स्टॅन्ड येथे ट्रॅक्टर संघटना यांच्या वतीने 'ऑर्केस्ट्रा' आयोजित केला आहे.



गुरुवार दिनांक ४ मे रोजी सकाळी ९ वाजता बैलगाडी शर्यत (ब गट) होणार आहेत. या बैलगाडी शर्यतीसाठी प्रथम तीन क्रमांकासाठी अनुक्रमे २१ हजार, १५ हजार, ११ हजार व ढाल अशी आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.


गुरुवारी रात्री दहा वाजता महालक्ष्मी मंदिर येथे 'वीर संगोळी रायाण्णा' कन्नड नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.



शुक्रवार दिनांक ५ मे रोजी रात्री दहा वाजता महालक्ष्मी मंदिर येथे जय हनुमान नाट्यसंघ महालिंगपूर यांचे 'घत्तरगी भागम्मा'( बंजी तोटलु तुगीतु) हे कन्नड नाटक आयोजित केले आहे.



शनिवार दिनांक ६ मे रोजी सकाळी दहा वाजता भव्य बैलगाडी शर्यत (अ गट) होणार आहेत. या स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांसाठी अनुक्रमे ५१ हजार, ४१ हजार, ३१ हजार व ढाल अशी आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.


याच दिवशी (शनिवार) सकाळी ९ वाजता घोडागाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. यातील यातील प्रथम तीन क्रमांकास अनुक्रमे १० हजार, ७ हजार, ५ हजार अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.


रात्री दहा वाजता महालक्ष्मी मंदिर येथे श्री मल्लिकार्जुन नाट्य संघ, रणबेळगली, महालिंगपूर यांचे 'हेन्न्नू संसारद कन्नु' ( सती संसारद ज्योती) कन्नड नाटकाचे आयोजन केले आहे.


तेरणी : येथील श्री. करनाईक मंदिर. 


तेरणीकर मित्रमंडळातर्फे घोड्यावर बसून पळविण्याच्या शर्यती


यात्रेनिमित्त येथील तेरणीकर मित्र मंडळ यांच्यातर्फे गुरुवार दिनांक ४ मे रोजी सकाळी ९ वाजता घोड्यावर बसून पळविण्याच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे १०००१, ७००१, ५००१ तर उत्तेजनार्थ म्हणून २१०१ अशी आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. या स्पर्धेसाठी सुहास चव्हाण, संतोष व्हनोळी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.