नवी दिल्ली : रिझर्व बँकेने 2000 च्या नोटांची छपाई बंद करण्याचा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. या नोटा 30 सप्टेंबर पर्यंत बँकेत जमा करता येतील असे आरबीआयने म्हटले आहे.
नोव्हेंबर 2016 मध्ये मोदी सरकारने नोटबंदीचा निर्णय घेऊन एक हजाराची नोट बंद केली होती. त्यानंतर दोन हजाराची नोट चलनात आणण्यात आली होती. दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्याचा आरबीआयने निर्णय घेतला असला तरी सध्या तरी या नोटा चलनात सुरु असतील.

