गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्षपदी अभय देसाई (अडकूर) तर उपाध्यक्षपदी रवींद्र शेंडुरे (भडगाव) यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवडीसाठी सर्वपक्षीय बैठक पार पडली या बैठकीत या दोन्ही नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. ही निवड प्रक्रिया सहाय्यक निबंधक अमित गराडे यांच्या उपस्थितीत पार पडली. सर्व पक्षांना रोटेशन पद्धतीने अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची संधी देण्याचे ठरविण्यात आले आहे. बाजार समितीची निवडणूक ही बिनविरोध झाली होती. आजच्या पदाधिकारी निवडीही बिनविरोध पार पडल्या.

