Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हलकर्णीत कलाम फौंडेशन मार्फत आयोजित नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

शिबिरात ११३ नेत्र रुग्णांची तपासणी

      




गडहिंग्लज (प्रतिनिधी): कुल्लोळी नेत्रालय सांगली व कलाम फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हलकर्णी येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर उर्दू विद्या मंदिर येथे संपन्न झाले. अध्यक्षस्थानी सरपंच सौ. योगिता संगाज होत्या. या शिबिरात ११३ नेत्र रुग्णांची तपासणी करण्यात आली.




या शिबिराची सुरुवात हाफिज सद्दाम यांनी केली. फौंडेशनचे उपाध्यक्ष बाबालाल अतार यांनी कलाम फौंडेशनचे कार्य थोडक्यात विशद केले. कलाम फौंडेशन सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा क्षेत्रात कार्यात अग्रेसरपणे कार्य करत आहे.




कुल्लोळी नेत्रालयचे डॉ कमरुद्दीन शेख, डॉ. हरून चौगुले, डॉ. अमित, फील्ड ऑफिसर सईद मुजावर, मौलाना मुबारक नाईकवाडे यांच्या टीमने रुग्णांची तपासणी केली. या शिबिरात एकूण 113 रुग्णांची तपासणी करून 13 रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी सांगली येथे नेण्यात आले.




यावेळी विजय शेरवी, सुन्नत जमातचे अध्यक्ष अल्लीसो कादरभाई, उपाध्यक्ष नजीर बागवान, उपसरपंच सलीम यमकनमर्डी, ग्रामपंचायत सदस्य सदस्य शिवानंद मठपती, हानिफ ताशिलदार, माजी सरपंच असगर बागवान, आप्पासाहेब यमकनमर्डी, मौला हावळे, इमामसाहेब पानारी, सलीम कुंदरगी, कलाम फौंडेशनचे  कार्याध्यक्ष मुबीन बामणे, सचिव राज खलिफा, उपाध्यक्ष रहमान मकानदार, खजिनदार इरफान मकानदार,  हसन ताशिलदार, इस्माईल कादरभाई, राजू कादरभाई, फय्याज ताशिलदार रियाज कादरभाई शब्बीर पानारी, ख्वाजा मालदार  उपस्थित होते. आभार ख्वाजा मालदार यांनी मानले.






Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.