Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दरोड्याचा चोवीस तासात छडा लावणाऱ्या आजरा पोलिसांचा शुक्रवारी होणार सत्कार



आजरा (प्रतिनिधी): आजरा पोलिसांनी तालुक्यातील रायवाडा या ठिकाणी पडलेल्या सशस्त्र दरोड्यातील दरोडेखोरांना 24 तासात मुद्दे मालासह अटक करून जलद गतीने तपास केल्याबद्दल विविध सामाजिक संस्था, संघटना,गुरव समाज व नागरीक यांच्या वतीने या तपासातील पथकाचा शुक्रवार दिनांक 12 रोजी आजरा तहसील कार्यालय या ठिकाणी दुपारी 1.30 वाजता सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला आहे.


      


15 ते 20 जणांनी सशस्त्र दरोडा टाकला होता. दरोडेखोरांनी घरातील सदस्यांना बांधून घालून मुद्देमाल घेऊन प्रसार झाले होते. आजरा पोलिसांनी तातडीने वेगवान तपासाची चक्रे फिरवत  24 तासात दरोडेखोराना ताब्यात घेतले. या मोठ्या धाडसाचे कौतुक सर्वत्र होत आहे. यासाठी सामाजिक संस्था व कष्टकरी संघटनांच्या वतीने शुक्रवार दिनांक 12 रोजी आजरा तहसील कार्यालय या ठिकाणी तपासातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या सत्कारामुळे चांगले काम करणाऱ्या पोलिसांना आणखी बळ मिळेल व इतरांना प्रेरणा मिळण्यास मदत होणार आहे. या सत्काराला तालुक्यातील विविध सामाजिक संस्था, कष्टकरी संघटना प्रतिनिधी व नागरीक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन कॉ. शिवाजी गुरव यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.