Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भक्तांच्या नवसाला पावणारी नंदनवाडची श्री. महालक्ष्मी देवी

यात्रेला उत्साहात प्रारंभ, यात्रा कमिटीचे सुयोग्य नियोजन 


भाविकांच्या गर्दीने गाव फुलला, भक्तिमय वातावरण  




नंदनवाड (ता. गडहिंग्लज) येथील श्री महालक्ष्मी देवीच्या पंचवार्षिक यात्रेला प्रारंभ झाला असून ही यात्रा शनिवार (दिनांक१३)पर्यंत चालणार आहे. जागृत ग्रामदेवता, नवसाला पावणारी देवी म्हणून महालक्ष्मी देवीची ओळख असून गावात भक्ती भावाने ग्रामस्थांनी यात्रेचे नियोजन केले आहे. त्यानिमित्त......




गडहिंग्लज: तालुक्याच्या पूर्व भागातील नंदनवाड या १६०० लोकवस्तीच्या गावात विविध राजकीय पक्ष असले तरी सार्वजनिक कार्यक्रम राजकारणविरहित आणि शांततेत पार पाडण्याची परंपरा या गावची आहे. इथल्या लक्ष्मी देवीची यात्रा दर पाच वर्षांनी होते.



येथील मंदिराची स्थापना १९१७ मध्ये झाली. पूर्वी पत्र्याच्या शेडमध्ये साध्या स्वरूपात मंदिर होते. ग्रामस्थांनी एकत्र येऊन मंदिर उभारणीसाठी श्रमदान केले. त्यावेळी वाहतुकीची सुविधा नसताना देखील विशिष्ट प्रकारच्या दगडातुन मंदिराची उभारणी केली  गेली आहे, हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे.



सदर मंदिराची उभारणी कै. शामराव सलामवाडे, कै. सुबराव‌ जाधव, कै. कलापा पाटील, कै. नवलापा टोणपी, कै. बाबुराव जाधव,  कै.नागापा पोवार, कै.बसवंत बिद्रेवाडे, रामा राजगोळे, पारेसा आकोळे, शिवाजी बिरंजे, लक्ष्मण सावेकर, आपासो देसाई, दिनकर सावेकर, बोगरनाळ, शहाजी कापसे, दीपक पुजारी, महाबळेश्वर कापसे यांच्या पुढाकाराने झाले.



         

गावची महालक्ष्मीची मूर्ती अठरा भुजांची आहे. देवीच्या अंगावर सोन्याचे दागिने आहेत. यात्रा काळात मिरवणूक काढण्यासाठी लक्ष्मी देवीची खास लाकडी मूर्ती सुतार कुटुंबियांनी बनविली आहे. हीच मूर्ती यात्रा काळात खांद्यावरून खेळविली जाते. सुतार यांच्या घरापासूनच मुर्तिची मिरवणूक सुरु होते. सुतार गल्लीमध्ये छोटेसे लक्ष्मी मंदिरही आहे.




लाकडी मूर्ती आणि  या मंदिराची देखभाल सुतार कुटुंबीयांकडेच असते. गावातील मुख्य मंदिरातील मूर्तीची पूजा अर्चा परंपरेप्रमाणे पाटील कुटुंबांकडे आहे. ही देवी जागृत व नवसाला पावणारी असल्याने मोठ्या भक्तीभावाने यात्रा उत्सव काळात भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात.




यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, उपाध्यक्ष महादेव पोवार, सरपंच शेवंता मगदूम, उपसरपंच तायगोंडा बोगरनाळ, दीपक पुजारी, राजू दडीकर, प्रशांत बोगरनाळ, संतोष जाधव, शामा बिद्रेवाडी, मोहन गोसावी, तात्यासो देसाई, अप्पू बोगरनाळ, बाळू भोसले, सुभाष सुतार यांच्यासह समिती सदस्य परिश्रम घेत आहेत.







Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.