Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष डॉ.गंगाधर व्हसकोटी यांच्यावरील हल्ल्याचा छडा लावा

गडहिंग्लज तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलीस ठाण्याकडे मागणी


मॉर्निंग वॉकला जाताना गुरुवारी पहाटे अज्ञातांकडून झाला होता हल्ला 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष डॉ.गंगाधर व्हसकोटी यांच्यावर मॉर्निंग वॉकला जाताना अज्ञातांकडून झालेल्या हल्ल्याचा लवकरात लवकर छडा लावण्यात यावा अशी मागणी गडहिंग्लज तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गडहिंग्लज पोलीस ठाण्याकडे निवेदनातून केली आहे. 



या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष डॉ. गंगाधर व्हसकोटी यांच्यावर दिनांक ८ जून रोजी पहाटे साडेपाच वाजता मॉर्निंग वॉकला जाताना काही अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. सदरची घटना घडून तीन दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. या हल्ल्याप्रकरणी येत्या दोन-तीन दिवसात छडा लावला गेला नाही तर नाईलाजाने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे न्याय मागावे लागेल. प्रसंगी आंदोलनाचा इशारा देखील या निवेदनातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.



यावेळी तालुकाध्यक्ष बाबासाहेब पाटील, महाबळेश्वर चौगुले, अमरसिंह चव्हाण, शिवप्रसाद तेली, जयकुमार मन्नोळी, अभिजीत पाटील, विकी कोणकेरी, आण्णासाहेब पाटील, बसवराज स्वामी, बाबुराव माने, दीपक पुजारी, सदाशिव सावंत, शिवाजी राऊत, शुक्राचार्य चोथे, अंकुश रणदिवे, जितेंद्र रेडेकर, आप्पासाहेब गडकरी, सहदेव कोकाटे, प्रवीण नलावडे, एन. आर. पाटील, बाळकृष्ण भोसमोडे, भारत झळके, शिवराज देसाई  राजेंद्र रेडेकर ,सुशांत नौकुडकर , प्रवीण शिंदे, प्रवीण पाटील, रायगोंडा पाटील, राजू कलगुटगी, शिवानंद देसाई, उमाकांत चव्हाण आदींसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.