कोल्हापूर : संकेश्वर- बांदा महामार्ग बाधित शेतकरी संघटनेच्या वतीने आपल्या मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु करण्यात आले.
आंदोलनामध्ये महामार्ग बाधित शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष भाई दिगंबर कांबळे सहभागी झाले आहेत. यावेळी आम आदमी पार्टीचे निलेश रेडेकर यांनी सक्रिय पाठिंबा दिला. आंदोलनाचे नेतृत्व शिवाजी गुरव, शिवाजी इंगळे, अनिल शिंदे करत आहेत. आंदोलनामध्ये आनंद येसने, मारुती इंगळे, दत्ता शेवाळे राजाराम इंगळे, रामा तांबेकर, नाना शिंदे, बाळू चव्हाण, वसंत उबारे, प्रकाश सुतार, दिलीप शिंत्रे शरद पवार यांच्यासह शेतकरी सहभागी झाले आहेत.

