Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नौकुड येथे 'शिवस्वराज्य दिन' उत्साहात साजरा



गडहिंग्लज (प्रतिनिधी): नौकुड येथील ग्रामपंचायतीच्या वतीने 'शिवस्वराज दिन' साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच शुक्राचार्य चोथे यांची प्रमुख उपस्थिती होती. 



यावेळी एस. टी महामंडळ गडहिंग्लज विभागात वाहक पदाची सेवा बजावून निवृत्त झालेले श्रीकांत सनाप्पा गुरव, गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्यात सेवा बजावून निवृत्त झालेले माजी सैनिक अशोक मारुती गुरव, माजी सैनिक गजेंद्र यशवंत मांगले, भारतीय सैन्य दलात सेवा बजावत असलेले जवान जीवन भिमराव गोडसे यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला.           



                                                                


 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार 

                                                  

सामाजिक क्षेत्रात कार्य केल्याबद्दल सौ.कविता शिवाजी मांगले यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देण्यात आला. यावेळी सरपंच शुक्राचार्य चोथे, ग्रामसेवक विजय जाधव, ग्रा. पं. सदस्या सौ. हिराबाई संभाजी चौगुले, अंगणवाडी सेविका,  आशासेविका, मदतनीस यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.