Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भडगाव येथे भाविकांच्या अलोट गर्दीत गुड्डादेवीची यात्रा उत्साहात



गडहिंग्लज (प्रतिनिधी): भडगाव येथील डोंगरावरील श्री गुड्डादेवीची यात्रा भाविकांच्या अलोट गर्दीत मोठ्या उत्साहात पार पडली.



यात्रेत भडगावसह चोथेवाडी, बंदी वसाहत, बेरडवाडी, चव्हणवाडी, भोई तळ, मरगुद्रीवाडी, मुकनावरवाडी, समर्थनगर, दत्तनगर वसाहतीमधून मोठ्या संख्यने भाविक मंगळवारी पहाटे गरम पाण्याच्या घागरी घेवून दाखल झाले होते. त्यानंतर देवीला अभिषेक घालून पूजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांच्या उपस्थितीत सामुदायिक आरती करण्यात आली. त्यानंतर भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. सायंकाळी ५ वाजता गावातील गुड्डादेवी मंदीरापासून पालखी मिरवणूक सुरू होऊन मुख्य रस्त्यावरून डोंगरावरील मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.



मंदिरात भडगावचे इनामदार लिगोंडा देसाई यांच्या हस्ते सपत्नीक पुजा व आरती करून योत्रेची सांगता झाली.  सदर यात्रा काळात गावचे सरपंच सौ. वंदना शेंडूरे, पोलीस पाटील उदय पुजारी, माजी सरपंच बसवराज हिरेमठ, बाजार समितीचे उपसभापती रवींद्र शेंडूरे, अण्णासाहेब पाटील, तलाठी प्रल्हाद खटावकर, सामजिक कार्यकर्ते वसंत नाईक, संचिदानंद शिंत्रे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी श्री गुड्डादेवी यात्रा समितीने विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.