Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज शहरात टेलिफोन लाईनच्या नावाखाली रस्त्यांची खोदाई थांबवा, अन्यथा आंदोलन

उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकाऱ्यांना मनसेच्या वतीने निवेदन 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): टेलिफोन ओएफसी लाईन टाकण्याच्या नावाखाली शहरातील रस्त्यांची खोदाई करून शहराचे विद्रूपीकरण करण्यात येत आहे. हे रोखावे अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी उपविभागीय अधिकारी, पालिका मुख्याधिकारी, तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.


 

या निवेदनात म्हटले आहे की, अलिकडे नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शहरातील गल्ली बोळासह सर्वत्र डांबरीकरण करून शहर सुंदर बनविले आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर टेलिफोन ओएफसी लाईन टाकण्याच्या नावाखाली शहरातील सर्व रस्ते खोदाईचे काम करून शहराचे विद्रुपीकरण करून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे. टेलिफोन लाईन टाकण्यास आमचा विरोध नाही. मात्र ऐन पावसाळ्याच्या तोंडावर डांबरीकरण करण्यास परवानगी नसते. असे असताना सुध्दा शहरात केलेले सर्व रस्ते कोणत्या अधिकाराखाली खोदाई करण्यास परवानगी दिली याचा खुलासा करावा. नागरिकांच्याकडून मिळालेला पैसा हा रस्ते विकासासाठी वापरला जातो आणि डांबरीकरण केल्यानंतर लगेच खुदाई करण्यास परवानगी दिली जाते हा नागरिकांच्या भावनाशी खेळ आहे. याची परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यावर  कडक कारवाई करण्यात यावी.


ऐन पावसाळ्यात खोदाई करून शहरामध्ये चिखलाचे साम्राज्य निर्माण केल्यास नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार आहे. आतापर्यंत खोदाई केलेल्या ठिकाणी तात्काळ डांबरीकरण करणेत यावे, पावसाळ्यात खड्डे व चिखलाचे साम्राज्य पसरणार नाही याची काळजी घेण्यात यावी.अशी मागणी या निवेदनातून केली आहे. अन्यथा नागरिकांसह मनसे आंदोलन करेल असा इशारा देखील या निवेदनातून दिला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.