गडहिंग्लज (प्रतिनिधी): शिवराज महाविद्यालयात नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास तीन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साजऱ्या होणाऱ्या 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह' निमित्त 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020' या विषयावर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टरचे प्रदर्शन भरविण्यात आले.
या पोस्टर प्रदर्शनाचे उदघाटन संस्था सचिव डॉ.अनिल कुराडे व प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.ए. एम. हसुरे यांनी केले. महाविद्यालयाच्या विविध विभागाच्या ऐंशीहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनीनी तयार केलेल्या पोस्टरव्दारे माहिती देणारे, शिवाय या शैक्षणिक धोरणातून राबविण्यात येणारे विविध उपक्रम, डिजिटल पोर्टलव्दारे उपलब्ध ऑनलाईन कोर्सेस आदीबाबत सविस्तर माहिती सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यावेळी प्रा.सौ.बिनादेवी कुराडे, 'नॅक'चे समन्वयक प्रा.किशोर अदाटे, ग्रंथपाल संदीप कुराडे यांच्यासह प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
या पोस्टर प्रदर्शनचे संयोजन प्रा.निळकंठ भोसले, प्रा.गौरव पाटील, डॉ. प्रवीण डोंगरे, प्रा. सुप्रिया मिसाळ, प्रा. विश्वजीत कुराडे, प्रा. संकेत पाटील, डॉ. विद्या देशमुख, प्रा. नलिनी लोंढे यांनी केले. प्रा. दीपिका खांडेकर- पंडित यांनी सर्वांचे आभार मानले.




